Akash Deep : इंग्लंड दौऱ्यावरून परतताच आकाशदीपने खरेदी केली नवीन कार, बहिणींबरोबर फोटो केले शेअर
( Akash Deep) भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने इंग्लंड दौऱ्यातील ऐतिहासिक कामगिरीनंतर लखनौमध्ये नवीन टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली आहे. या खास प्रसंगी त्याची बहीण ज्योती सिंह, आई लड्डुमा देवी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आकाश दीपने लिहिले आहे की, "स्वप्न पूर्ण झाले. चावी मिळाली, ज्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, त्यांच्यासोबत." आकाश दीपने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीनही बहिणी, आई आणि काही नातेवाईक दिसतात.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.आकाश दीपने इंग्लंड दौऱ्यावर 3 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंड मालिकेत आकाश दीपने दुसऱ्या टेस्टमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या.मॅंचेस्टर टेस्टमध्ये दुखापतीमुळ तो बाहेर होता, पण ओव्हलमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये तो परत आला.