मराठमोळ्या अविनाश साबळेची आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

मराठमोळ्या अविनाश साबळेची आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेने कमाल केली आहे.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेने कमाल केली आहे. भारताचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे 12वे सुवर्णपदक आहे.

भारताने आशियाई खेळांमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये म्हणजे ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याची अपेक्षा आहे. अविनाश साबळेने सुवर्णपदक जिंकून त्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. अविनाश साबळे हा आशियाई खेळांच्या इतिहासात ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. मराठमोळ्या अविनाश साबळेने 8:19:53 च्या वेळेसह पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक जिंकले.

दरम्यान, आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या पदकांची संख्या 44 वर पोहोचली आहे. यामध्ये 12 सुवर्ण आणि 16 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत स्टार महिला बॉक्सर निखत जरीनला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात निकतला थायलंडच्या खेळाडूकडून 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला आणि आता तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com