एशिसन गेम्समध्ये भारताचा सुवर्णवेध; चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

एशिसन गेम्समध्ये भारताचा सुवर्णवेध; चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

हँगझोऊ येथे खेळवल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

नवी दिल्ली : हँगझोऊ येथे खेळवल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंग पनवार आणि ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर या त्रिकुटाने हे सुवर्ण यश संपादन केले. यासह भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत चीनच्या खेळाडूंचा विश्वविक्रम मोडीत काढला.

ऐश्वर्या-दिव्यांश-रुद्रांश यांनी पात्रता फेरीत 1893.7 गुण मिळवले. दक्षिण कोरिया 1890.1 गुणांसह दुसऱ्या, तर चीन 1888.2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रुद्रांक्षने भारतीय संघासाठी 631.6 गुण मिळवले. ऐश्वर्याने 631.6 गुण मिळवले, तर दिव्यांशने 629.6 गुण मिळवले.

या स्पर्धेत भारताने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर ऐश्वर्या आणि रुद्रांक्ष 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. दिव्यांशनेही टॉप-8 मध्ये स्थान मिळविले होते, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक देशातून फक्त दोनच स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतात, त्यामुळेच दिव्यांश बाहेर पडला.

भारताने आतापर्यंत जिंकली 8 पदके

मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता जिंदाल - 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य

अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग, पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य

बाबू लाल आणि लेख राम, पुरुष कॉक्सलेस दुहेरी - (रोइंग): कांस्य

पुरुष कॉक्सड 8 संघ - (रोइंग): रौप्य

रमिता जिंदाल - महिला 10 मीटर एअर रायफल (नेमबाजी): कांस्य

ऐश्वर्या तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार, 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): सुवर्ण

आशिष, भीम सिंग, जसविंदर सिंग आणि पुनीत कुमार - मेन्स क्वाड्रपल स्कल्स (रोइंग) : कांस्य

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com