Asian Games: चीनकडून रडीचा डाव; नीरज चोप्रासह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय?

Asian Games: चीनकडून रडीचा डाव; नीरज चोप्रासह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय?

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. चीनच्या हँगझाऊ शहरात या स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत चीनचा रडीचा डाव पाहायला मिळाला. चीनच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय खेळाडूंविरुद्ध अन्याय केला जात असल्याची चर्चा होताना दिसत आहेत. नीरज चोप्रा जेव्हा आपल्या भालाफेकीचा पहिला प्रयत्न करण्यासाठी उतरला तेव्हा त्याच्यावर अन्याय केला गेल्याचे पाहायला मिळाले.

नीरजने पहिल्यावेळी जवळपास ८७ मीटरचा थ्रो केला. मात्र,पंचांनी सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे त्याचा हा थ्रो मोजला जाऊ शकला नाही. मात्र, मार्किंग लाईनवरुन स्पष्ट दिसत होतं ही, त्याचा थ्रो ८५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर गेला आहे.पंचांनी नीरज चोप्राला पुन्हा प्रयत्न करायला सांगितले. त्यामध्ये नीरज चोप्राला फक्त 82.38 मीटर थ्रो करता आले.

भारताची धावपटू ज्योती यार्राजीसोबत देखिल हेच झाले. ती १०० मीटर हर्डल शर्यतीत सहभागी झालेली असताना चीनच्या यानी वू हिच्यासह तिला अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र बऱ्याच वादानंतर तिला पात्र ठरवले गेले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com