भारताला पाचवे सुवर्ण! सिफ्ट कौरची नेमबाजीत कामगिरी

भारताला पाचवे सुवर्ण! सिफ्ट कौरची नेमबाजीत कामगिरी

भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. सिफ्ट कौरने 50 मीटर रायफल स्पर्धेत देशासाठी पाचवे सुवर्ण जिंकले आहे.

नवी दिल्ली : भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. सिफ्ट कौरने 50 मीटर रायफल स्पर्धेत देशासाठी पाचवे सुवर्ण जिंकले आहे. याच स्पर्धेत चीनने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. तर भारताच्या आशीने 50 मीटर रायफल प्रकारात तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. आज चौथ्या दिवशी भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

भारताला पाचवे सुवर्ण! सिफ्ट कौरची नेमबाजीत कामगिरी
Asian Games : नेपाळच्या दिपेंद्र सिंगने मोडला रेकॉर्ड, 9 चेंडूत ठोकल्या 50 धावा

50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौरने 469.6 गुणांसह विश्वविक्रम केला. या विक्रमासह तिने 462.3 गुणांसह चीनच्या झांग क्विओंग्यूचा पराभव केला. अशा प्रकारे सिफ्टने मोठ्या फरकाने सुवर्ण जिंकले. तर आशी चोक्सीने 451.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. आशीच्या खराब शॉटने तिला रौप्यपदकापासून दूर ठेवले, त्यानंतर तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, सिफ्ट कौरने चौथ्या दिवशी भारतासाठी एकूण पाचवे आणि दुसरे सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्या महिला संघाने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. यानुसार आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. यासह भारताच्या खात्यात एकूण 21 पदके आहेत. यात पाच सुवर्णांव्यतिरिक्त 6 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com