Babar Azam
Babar Azam

पाकिस्तानच्या बाबर आझमने रचला इतिहास! 'असा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पुन्हा एकदा टी-२० सामन्यात अप्रतिम खेळी केली आहे. आझमने क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Published by :

Babar Azam Scripts History : पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेचा चौथा सामना ३० मे ला केनिंग्टन ओवलमध्ये खेळवण्यात आला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पुन्हा एकदा टी-२० सामन्यात अप्रतिम खेळी केली आहे. आझमने क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून आझमने टी-२० फॉर्मेटमध्ये २५०० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

बाबर आझमने कर्णधार म्हणून ८१ टी-२० सामन्यांमध्ये २५२० धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंचच्या नावाची नोंद आहे. फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी ७६ टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून २२३६ धावा केल्या आहेत. तसच तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियमसनची नोंद आहे. विलियमसनने कर्णधार म्हणून टी-२० फॉर्मेटमध्ये २१२५ धावा केल्या आहेत. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर भारताची स्टार जोडी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावाची नोंद आहे. रोहितने टी-२० चा कर्णधार म्हणून १६४८ आणि कोहलीने १५७० धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज

बाबर आझम - ८१ सामने - २५२० धावा - ३ शतक - २३ अर्धशतक

एरोन फिंच - ७६ सामने - २२३६ धावा - १ शतक - १४ अर्धशतक

केन विलियमसन - ७१ सामने - २१२५ धावा - १६ अर्धशतक

रोहित शर्मा - ५४ सामने - १६४८ धावा - ३ शतक - १० अर्धशतक

विराट कोहली - ५० सामने - १५७० धावा - १३ अर्धशतक

बाबरने कुटल्या ४ हजार धावा

बाबर आझमने टी-२० फॉर्मेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. स्टार फलंदाजाने पाकिस्तानसाठी टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण ११९ सामने खेळले आहेत. त्याने ११२ इनिंगमध्ये ४१.०५ च्या सरासरीनं ४०२३ धावा केल्या आहेत. बाबरने आणखी १४ धावा केल्यास तो टी-२० मध्ये विराट कोहलीला (4037) मागे टाकून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com