Gautam Gambhir Latest News
Gautam GambhirTwitter

Gautam Gambhir: ठरलं! गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; BCCI ने केली मोठी घोषणा, जय शहा म्हणाले...

टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर टीम इंडियाचा कोच बनणार, अशा चर्चा क्रिकेटविश्वात रंगू लागल्या होत्या.
Published by :

Gautam Gambhir Team India New Head Coach : टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर टीम इंडियाचा कोच बनणार, अशा चर्चा क्रिकेटविश्वात रंगू लागल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून भारतीय क्रिकेट संघाच्या हेड कोचची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं आयपीएलच्या १७ व्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्ससाठी मेंटॉर म्हणून भूमिका बजावली होती. गंभीर तिनही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा हेड कोच असेल, अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे.

जय शहा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं, टीम इंडियाचा नवा हेड कोच म्हणून गौतम गंभीरचं मी स्वागत करतो. आधुनिक क्रिकेट वेगानं विकसीत झालं आहे. गौतमने या बदलत्या परिस्थितीला जवळून पाहिलं आहे. त्याने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये विविध भूमिका साकारून चमकदार कामगिरी केली आहे. गौतम गंभीर भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहे, याचा मला विश्वास आहे. टीम इंडियासाठी त्याच्याकडे स्पष्ट दृष्टीकोन आणि दांडगा अनुभव आहे. सर्वात महत्त्वाची जबाबदारी असलेल्या टीम इंडियाच्या कोचिंगसाठी गंभीरला पूर्णपणे स्थान देण्यात आलं आहे. बीसीसीआय त्याच्या नवीन प्रवासासाठी पूर्णपणे पाठिंबा देत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ संपल्यानंतर राहुल द्रविडचा टीम इंडियाचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपला आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप २०२३ चा फायनलचा सामना खेळला. परंतु, यामध्ये टीम इंडियाला किताब जिंकला आलं नाही. त्यानंतर टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकून द्रविडचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलं.

श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरला मिळणार कोचिंगची जबाबदारी

टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी व्ही.व्ही. एस लक्ष्मण कोचिंगची जबाबदारी पार पाडत आहे. त्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. २७ जुलैला या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. याचवेळी गौतम गंभीर प्रशिक्षकपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com