RCB Unbox 2024: आरसीबीच्या टीमच्या नावात मोठा बदल; IPL 2024 मध्ये दिसणार नव्या रुपात

RCB Unbox 2024: आरसीबीच्या टीमच्या नावात मोठा बदल; IPL 2024 मध्ये दिसणार नव्या रुपात

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) लोगो बदलण्यात आला आहे. आयपीएलच्या नवीन सीझनपूर्वी आरसीबीमध्ये हा मोठा बदल आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) लोगो बदलण्यात आला आहे. आयपीएलच्या नवीन सीझनपूर्वी आरसीबीमध्ये हा मोठा बदल आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)ने त्यांचे नाव बदलून 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' असे करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. IPL 2024 च्या आधी त्यांचा नवीन लोगो लाँच केला आहे.

मंगळवारी झालेल्या RCB अनबॉक्स कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. शुक्रवारी त्यांच्या आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. हे पूर्वीच्या बंगळुरू शहराचे नवीन नाव आहे, परंतु आरसीबीने ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. फ्रँचायझी आपल्या शहराच्या नवीन नावासह आयपीएल 2024 मध्ये प्रवेश करेल.

कर्नाटकच्या राजधानीचे नाव अधिकृतपणे बेंगळुरूवरून बेंगळुरू असे बदलल्यानंतर आरसीबीने फ्रँचायझीचे नाव 18 वर्षांनी बदलले आहे. आरसीबीने अनबॉक्स इव्हेंटमध्ये IPL 2024 सीझनसाठी नवीन लूक जर्सीचे अनावरण केले. विराट कोहली, कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि महिला प्रीमियर लीग विजेती कर्णधार स्मृती मानधना आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमादरम्यान जर्सी अनावरण कार्यक्रमात उपस्थित होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com