Commonwealth Game 2022 | wrestler divya kakran | arvind kejriwal
Commonwealth Game 2022 | wrestler divya kakran | arvind kejriwalteam lokshahi

Commonwealth Game 2022 : 'मुख्यमंत्री जी पुरस्कार ही नाही, मदत ही नाही', पदक विजेत्या कुस्तीपटूची तक्रार

अभिनंदनावर प्रतिक्रिया देताना मांडली आपली व्यथा

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये, भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली आणि 6 सुवर्णांसह 12 पदके जिंकली. यादरम्यान महिला कुस्तीपटू दिव्या काकरननेही कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले. 23 वर्षीय दिव्या काकरनने कांस्यपदकाच्या लढतीत टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमालियरचा 30 सेकंदात पराभव केला. (commonwealth game 2022 wrestler divya kakran delhi cm arvind kejriwal)

दिव्या काकरनला 68 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेच्या (0-11) आधारावर नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुद्दूकडून पराभव पत्करावा लागला. नंतर, ब्लेसिंग ओबोरुदुडूने अंतिम फेरीत प्रवेश केला, ज्यामुळे दिव्याला रिपेचेज खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तिने सलग दोन सामने जिंकून कांस्यपदक पटकावले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिव्या काकरनचे अभिनंदन केले.

Commonwealth Game 2022 | wrestler divya kakran | arvind kejriwal
Credit Card : 'या' 10 गोष्टी समजून घेणे आवश्यक, अन्यथा होत राहील नुकसान

आता दिव्या काकरनने अरविंद केजरीवाल यांच्या अभिनंदनावर प्रतिक्रिया देताना आपली व्यथा मांडली आहे. दिव्याने ट्विट केले की, 'पदकाचे अभिनंदन केल्याबद्दल दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री जी यांचे मनापासून आभार. माझी तुम्हाला एक विनंती आहे की मी गेली 20 वर्षे दिल्लीत राहून कुस्तीचा सराव करत आहे पण आजपर्यंत मला राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कमही देण्यात आलेली नाही आणि कोणतीही मदत करण्यात आलेली नाही.

Commonwealth Game 2022 | wrestler divya kakran | arvind kejriwal
चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर आता मुनगंटीवारांच्या विधानाचा अर्थ काय?

दिव्या पुढे म्हणाली, 'माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे असूनही इतर कोणत्याही राज्यातून खेळणाऱ्या इतर खेळाडूंचा ज्या प्रकारे सन्मान करता, तसाच माझाही सन्मान झाला पाहिजे.'

दिव्या काकरन यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये जेव्हा दिव्या काकरनने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले तेव्हा तिने जाहीरपणे तिची व्यथा मांडली होती. तेव्हा म्हणाली होती, 'मी वयाच्या 19 व्या वर्षी देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आणि दिल्लीला सलग 12 पदके दिली. तुम्ही म्हणाला होता की भविष्यात मदत मिळेल पण तसे झाले नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com