Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; PV सिंधू बनली भारतीय संघाची ध्वजवाहक

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; PV सिंधू बनली भारतीय संघाची ध्वजवाहक

राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय गटाचे नेतृत्व केलं. PV सिंधू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक बनली. ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही पार पडणार आहे.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक बनल्याबद्दल पीव्ही सिंधूने आनंद व्यक्त केला आहे. सिंधू म्हणाली, ''2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय दलाचा ध्वजवाहक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याबद्दल खूप आनंदी आहे आणि माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छिते. याशिवाय मला भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला ही संधी दिली.''

यासोबतच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता म्हणाले की, ''पीव्ही सिंधू (PV Sindhu) कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय संघाची ध्वजवाहक बनली याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही तिला शुभेच्छा देऊ इच्छितो. 2022 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे (India) 213 खेळाडू सहभागी होत आहेत. मात्र, नीरज चोप्रा दुखापतीमुळे या स्पर्धेचा भाग नाही.''

१९३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरूवात झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; PV सिंधू बनली भारतीय संघाची ध्वजवाहक
Commonwealth Games : आज भारतीय महिला संघापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com