Cricket In Olympics : 128 वर्षांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश; ‘आयओसी’कडून मंजुरी

Cricket In Olympics : 128 वर्षांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश; ‘आयओसी’कडून मंजुरी

128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याला 'आयओसी’कडून मंजुरी देण्यात आली आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार झाली. त्यानुसार आता 2028 पासून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये 2028 साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटसोबत यात फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, लेक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com