Abhishek Sharma :"बस ड्रायव्हरच्या तक्रारीमुळे संघातून बाहेर जाण्याची...."
Abhishek Sharma :"बस ड्रायव्हरच्या तक्रारीमुळे संघातून बाहेर जाण्याची...." अभिषेक शर्माचा गिलसोबतचा मोठा खुलासा Abhishek Sharma :"बस ड्रायव्हरच्या तक्रारीमुळे संघातून बाहेर जाण्याची...." अभिषेक शर्माचा गिलसोबतचा मोठा खुलासा

Abhishek Sharma :"बस ड्रायव्हरच्या तक्रारीमुळे संघातून बाहेर जाण्याची...." अभिषेक शर्माचा गिलसोबतचा मोठा खुलासा

आशिया कप 2025 स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करून भारतीय क्रीडारसिकांची मने जिंकणाऱ्या अभिषेक शर्माने एक मजेदार किस्सा उघड केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Abhishek Sharma to be dropped from the team because of Shubman Gill he himself told what happened : आशिया कप 2025 स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करून भारतीय क्रीडारसिकांची मने जिंकणाऱ्या अभिषेक शर्माने एक मजेदार किस्सा उघड केला आहे. भारतीय संघाचा ओपनर शुबमन गिल त्याचा जवळचा मित्र असला, तरी त्याच्यामुळेच कधीतरी संघातून बाहेर जाण्याची वेळ जवळ आली होती, असं अभिषेकने सांगितलं.

आशिया कपमधील अभिषेकची कामगिरी

या स्पर्धेत शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. गिलच्या बॅटमधून मोठी खेळी झळकली नाही, मात्र अभिषेकने दमदार फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्रास दिला. सात सामन्यांत त्याने 314 धावा केल्या आणि तीन अर्धशतकं झळकावली. त्याला सामनावीराचा किताब मिळाल्यानंतर गिलनेही त्याचं कौतुक केलं.

गिलसोबतची मैत्री आणि किस्सा

गिल आणि अभिषेक हे अंडर-16 पासून एकत्र खेळत आहेत. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात गौरव कपूर यांच्याशी बोलताना अभिषेकने एक जुना किस्सा सांगितला. धर्मशाळेत अंडर-16 स्पर्धा खेळली जात होती. हिमाचल, दिल्ली आणि पंजाब संघाचे खेळाडू तिथे सहभागी होते. मैदान हॉटेलपासून अवघं 500 मीटर अंतरावर होतं, मात्र खेळाडू बसने जात असत.

अभिषेक म्हणाला, “बस ड्रायव्हर गाणी वाजवायचा पण अचानक थांबवायचा. त्यावर आम्ही मोठ्या आवाजात पंजाबी गाणी लावायचो. यामुळे वाद व्हायचे. गिल नेहमी पुढे असायचा. एक दिवस सर्व ड्रायव्हर्सनी आमच्याविरोधात प्रशिक्षकांकडे तक्रार केली. आमची मुलं खूप असभ्य आहेत, असं सांगितलं.” या प्रकारामुळे प्रशिक्षकांच्या नजरेत खेळाडूंची प्रतिमा खराब होण्याची भीती होती. त्यावेळी संघातून बाहेर जाण्याची वेळही आली असं अभिषेकने सांगितलं. त्याने हसत सांगितलं की, “गिल कितीही चुकीचं करायचा, पण तो कधीच पकडला जायचा नाही. आम्ही मात्र अडचणीत यायचो.” अभिषेक शर्माचा हा किस्सा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गिल आणि अभिषेक यांच्यातील मैत्री किती जुनी आहे आणि त्यातून किती मजेदार आठवणी आहेत, हे या किस्स्यातून स्पष्ट झालं आहे. सध्या मात्र दोघेही भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू असून, भविष्यातील मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com