Jitesh Sharma RCB IPL 2025 : "आल्याची गेल्याची कोणाची..." RCB च्या विजयानंतर जितेशने काढली दृष्ट! व्हिडिओ व्हायरल
काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात अती तटीची चुरस पाहायला मिळाली. ही चुरस क्वालिफायर मध्ये पोहचण्यासाठी असल्याचं देखील पाहायला मिळालं. यादरम्यान आरसीबीने 6 गडी राखून 230 धावांचा पाठलाग करत लखनऊ विरुद्ध जबरदस्त विजय मिळवत थेट क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
यावेळी जितेश शर्मा आरसीबीच्या विजयासाठी एकतर्फी खेळला, त्याने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 85 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यावेळी त्याने 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदार दुखापतीतून पुर्णपणे सावरला नसल्यामुळे जितेश शर्माने संघाची जबाबदारी सावरली. या सामन्यावेळी तो 17व्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर नॉन-स्ट्रायकर पडल्यामुळे आऊट होता होता वाचला.
क्रिकेटमध्ये सामन्या दरम्यान किंवा सामन्यानंतर खेळाडू त्यांच्या अतरंगी कृतीसह कॅमेऱ्याद्वारे कॅप्चर होतात, आणि त्यानंतर त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो. यावेळी जितेश शर्माचा देखील एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवल्यानंतर जितेश शर्माने दृष्ट काढल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र त्याने ही नजर संघाची काढली की आरसीबीच्या चाहत्यांची हे कळालं नाही. त्याची ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जितेश शर्मा दृष्ट काढताना फार गोड वाटत असल्याचं नेटकऱ्यांनी आणि आरसीबीच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.