Virat Kohli Retirement : मोठी बातमी! रोहित पाठोपाठ विराटने सुद्धा दिला चाहत्यांना धक्का; कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
नुकतीच 7 मे रोजी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं त्याच्या सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत, कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर लगेच किंग कोहली म्हणजेच विराट कोहली याच्या देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना वेग आल्याच पाहायला मिळालं होत. रोहित पाठोपाठ विराट देखील निवृत्ती घेणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यासंदर्भात त्यावेळी विराटने कोणतीच अधिकृत माहिती दिली नव्हती.
मात्र आता रोहित पाठोपाठ क्रिकेटच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यादरम्यान इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा असून निवृत्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केली होती. मात्र विराटने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत.
किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराट कोहलीला बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. विराटने त्याच्या कसोटी सामन्यात 8.848 धावा केल्या असून त्याने 49.15 सरासरीने 27 सेंच्युरी तर 30 हाफसेंच्युरी मारल्या आहेत. कर्णधार म्हणून 68 सामन्यांत 40 विजय मिळवले असून त्याचा 254 हा सर्वोत्तम स्कोअर कोरला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांत त्याने महत्त्वपूर्ण खेळी खेळली असून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.
यादरम्यान विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो म्हणाला आहे की, "कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू घालून मी १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी असे धडे दिले जे मी सहन करेन. पांढऱ्या रंगात खेळण्यात काहीतरी खोलवरचे वैयक्तिक गुण आहेत. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडताना, ते सोपे नाही - पण ते बरोबर वाटते. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि त्याने मला अपेक्षा केल्यापेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने निघून जात आहे - खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी नेहमीच माझ्या कसोटी कारकिर्दीकडे हसतमुखाने पाहतो. #269 , साइन इनिंग."