MI IPL 2025 : MI विरुद्ध सामना जिंकत PBKS साठी उघडले Qualifier 1 चे दार, मुंबई इंडियन्सला अजूनही संधी?
सोमवारी 26 मे ला झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात पंजाबने मुंबईला 7 विकेट्ससह पराभूत करत क्वालिफायर 1 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. काल जयपूर मधील सवाई मानसिंह मैदानावर पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना पार पडला. यावेळी पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मुंबईची पलटन प्रथम फलंदाजी करत 184 धावांवर माघारी फिरली.
तर पंजाबने हे आव्हान स्विकारत 187 धावांची खेळी खेळत सामना जिंकला तसेच क्वालिफायर 1 चं तिकीट देखील फत्ते केलं आहे. पंजाब संघ या विजयाने 19 गुणांसह पॉईंट टेबलवर अव्वल स्थानी आहेत. तर गुजरात 18 गुणांसह पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानी आहे. त्याचसोबत बंगळुरू संघ 17गुणांसह पॉईंट टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर आहे, आणि मुंबई इंडियन्स कालच्या पराभवामुळे 15 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. यामुळे मुंबईला आता एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. मात्र मुंबईसमोर एलिमिनेटर सामन्यामुळे करो वा मरो अशी परिस्थिती उद्भवणार आहे.
मुंबई इंडियन्सकडे अजूनही संधी
पॉईंट टेबलवरील पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे संघ क्वालिफायर 1 साठी आमने सामने येतात, आणि त्यात जो संघ विजय मिळवतो त्याला थेट अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के करता येते. या सामन्यादरम्यान जो संघ पराभूत होतो त्याला संघाला क्वालिफायर 2 सामना खेळण्याची दुसरी संधी मिळते. मात्र त्यासाठी त्याला एलिमिनेटर सामना खेळावा लागतो. यादरम्यान जो संघ विजय मिळवतो त्याला क्वालिफायर 2 मध्ये जाण्याची संधी मिळते. त्याचसोबत इथे जो संघ पराभूत होतो त्याचे पुढील आव्हान संपते. मात्र एलिमिनेटर हा सामना करो वा मरो असा असतो.
सोमवारी 26 मे ला मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यात पंजाबने विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात उडी मारली आहे. तर पुढे मुंबई इंडियन्सला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवण महत्त्वाचं ठरणार आहे.