Jasprit Bumrah : बुमराहची एक्झिट तर 'हा' गोलंदाज करणार टीम इंडियामध्ये एन्ट्री! चौथ्या कसोटीदरम्यान मोठ्या बदलाची शक्यता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. सध्या भारत 1-2 ने मालिकेत पिछाडीवर असून, हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळेच हा सामना 'करो या मरो' असं दृश मानला जात आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चौथ्या टेस्टसाठी खेळण्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, बुमराहच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय सामना सुरु होण्याच्या दिवशी घेतला जाईल. ते म्हणाले की, सामना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बुमराहच्या खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने युवा गोलंदाज अर्शदीप सिंगचे नाव पुढे केले आहे. रहाणेच्या मते, इंग्लंडच्या हवामानात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका निर्णायक ठरू शकते. अर्शदीप दोन्ही दिशांनी चेंडू स्विंग करू शकतो तसेच तो स्पिनर्ससाठी उपयुक्त रफ क्षेत्र तयार करण्यातही मदत करतो, असे रहाणेने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.
सिंगने अजून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्याने 21 सामन्यांत 66 बळी घेतले आहेत. मात्र सराव सत्रात चेंडू थांबवताना त्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आहे. डोशेट यांनी सांगितले की, ही जखम किती गंभीर आहे हे पाहून निर्णय घेतला जाईल. भारताला मालिकेत टिकून राहण्यासाठी चौथा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर सर्वोत्तम संघ निवडण्याचे आव्हान आहे. दुखापतींमुळे संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.