IND vs AUS T20 : ...म्हणून टीम इंडियाला पराभव पत्कारावा लागला! दुसऱ्या T20मध्ये 3 चुका भोवल्या अन् तोंडचा घास हिसकावला गेला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत फक्त 125 धावा केल्या. भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. शेवटी ऑस्ट्रेलियाने केवळ 13.2 षटकांत लक्ष्य गाठलं आणि भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारताच्या तीन चुका त्यांच्या पराभवाच्या कारण ठरल्या आहेत.
भारताची पहिली चूक ही फलंदाजी क्रमात फेरबदल करण होत. सूर्यकुमार यादवने ठरल्या प्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. परंतु यावेळी संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. तर शिवम दुबेला आठव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. तसेच दुसरीकडे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे ५५ आणि ६२ च्या सरासरीने धावा काढणाऱ्या तिलक वर्मा यांना पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी ढासाळलेली पाहायला मिळाली.
तसेच दुसरी चूक म्हणजे, अक्षर पटेलला गोलंदाजी करायला लावले नाही. तो वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त त्याला देखील संधी मिळायला हवी होती. ज्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव अधिक सोप झालं असत.
त्याचसोबत तिसरी आणि शेवटची चूक ही होती की, बुमराहच्या पहिल्या षटकात फक्त 4 धावा मिळाल्या. हर्षित राणाने दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा दिल्या, परंतु मार्श आणि हेडने त्याच्याविरुद्ध चेंडू मिडल करण्याचा आत्मविश्वास वाढवला, ज्यामुळे त्यांना बुमराहला लक्ष्य करणे सोपे झाले. बुमराहने त्याच्या पहिल्या षटकात चेंडू अनेक अंशांनी स्विंग केला.


