Ishan Kishan SRH IPL 2025 : हैद्राबादला मोठा धक्का! पहिल्या सामन्यात चमकलेला ईशान किशन गंभीर जखमी
नुकतीच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा सामना पार पडला ज्यात सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय झाला या सामन्यान मुंबईच्या ईशान किशनची हैदराबादच्या संघात वादळी खेळी पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ईशान किशनने 47 बॉलमध्ये 1 1 चौकारांसह 6 षटकार मारले आणि 106 धावांची क्लास खेळी खेळत राजस्थानला पळता भुई थोडी केली.
त्यामुळे सनरायझर्स हैदराबादसाठी ईशान किशन हा सनरायझर्स हैदराबाद लकीचार्म ठरला आहे. पहिला सामना पाहता ईशानमुळे सनरायझर्स हैदराबादचा बाकी सामन्यांचा जो भार होता तो कुठे तरी कमी झालेला पाहायला मिळत होता. मात्र, असं असताना आता सनरायझर्स हैदराबादचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. कारण, विकेटकीपर आणि तुफानी फलंदाजी करणारा ईशान किशनला दुखापत झाली आहे.
ईशान किशन दुखापतग्रस्त
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 18 ओव्हर वेळी ईशान फिल्डिंग करत असताना दोन धावा वाचवण्याच्या नादात चेंडू थांबवताना त्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत झाल्यानंतर ईशानला खुप वेदना होत असल्याचे दिसून आले. यानंतर तो पुन्हा फिल्डिंगसाठी मैदानात परतला नाही. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात ईशान खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.