Virat Kohli IPL Retirement : कोहलीच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती समोर! विराट कोहलीची IPL मधून एक्सिट पक्की? RCB संघाने केला मोठा खुलासा
विराट कोहलीचा चाहतावर्ग जगभरात पोहचला आहे. आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासिक क्षणानंतर विराट कोहली तसेच चाहते देखील भावूक झाला. आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेल्या विराटबाबत आयपीएल जिंकल्यानंतर निवृत्तीची चर्चा रंगल्या होत्या. आगामी वर्षात आयपीएल 2026 हंगामाला सुरुवात होणार आहे.
याचपार्श्वभूमिवर क्रिकेटप्रेमींसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने आरसीबीकडून खेळण्यासाठी आवश्यक असणारा करार रिन्यू केला नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो आरसीबी संघाकडून खेळतो आहे. त्यामुळे यंदा देखील त्याला करार रिन्यू करण्यासाठी विचारण्यात आले होते.
मात्र त्याने यासाठी अद्याप काहीच निर्णय घेतला नसून करार देखील रिन्यू न केल्याचा दावा केला जात आहे. त्याचसोबत भविष्यात माझा चेहरा किंवा माझे नाव न वापरता तुम्ही भविष्यातील नियोजन आखावे, असेही कोहलीने रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू या फ्रेन्चायझीला सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता विराट कोहली आयपीएलमधून देखील निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आगामी वर्षात आयपीएल 2026 हंगामाला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रत्येक संघाची फ्रँचायझी तयारी करत आहेत. या फ्रेन्चायझीकडून खेळाडूंचे करार रिन्यू केले जात आहेत. यावर विराट कोहलीने अजून कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींना आणि विराटच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र अद्याप याबाबत आरसीबी संघ किंवा विराट कोहली यांच्याकडून कोणेतेही स्पष्टीकरण आलेले नाही.