IND vs NZ Match : टीम इंडियाला सहावा झटका केएल राहुलही पॅव्हेलियनमध्ये परतला
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तब्बल 24 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमने सामने आले आहेत. यापूर्वी 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर गेल्या 24 वर्षात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये एकही सामना खेळवण्यात आला नाही. रविवार 2 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना असून सामान्यात बाजी कोण मारणार? हे पाहणं औत्सुकतेचे ठरणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी २ : ३० वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले आहे. रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये काही बदल केले आहेत. यात रोहितने वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला वगळून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला संधी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया 4 फिरकीपटूंसह मैदानात उतरेल.
फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली आहे. मात्र तिसऱ्याच ओव्हरला उपकर्णधार शुभमन गिल 3 धावा काढत बाद झाला. त्याला गोलंदाज मॅट हेन्रीने बाद केले. गिल पाठोपाठ रोहित शर्माची सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट पडली. रोहित शर्माला काइल जेमिसनने बाद केले. यावेळी रोहित शर्माने 17 बॉलमध्ये 15 धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या 22 धावांवर 2 विकेट अशी होती.
त्यानंतर मैदानामध्ये विराट कोहलीने 14 चेंडूत 11 धावा काढल्या आहेत. अक्षर पटेल याने 22 चेंडूत 11 धावा करत अजूनही नाबाद असून अक्षर पटेल 75 चेंडूत 4 चौकार करून नाबाद आहे. श्रेयस अय्यरने 75 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील २२ वे अर्धशतक आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे.
न्यूझीलंडचे खेळाडू प्लेईंग 11
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके
भारताची खेळाडू प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती