IND vs PAK
IND vs PAK

IND vs PAK : पराभवाने पेटला संताप! “पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…” माजी दिग्गजांचा सल्ला

टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने दमदार खेळ करत 61 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने दमदार खेळ करत 61 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफ यांनी संताप व्यक्त करत काही ज्येष्ठ क्रिकेटपटूंवर थेट निशाणा साधला.

त्यांनी बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांना टी-20 संघातून बाजूला करण्याची मागणी केली. “कमकुवत संघांवर जिंकून उपयोग नाही, मोठ्या सामन्यात कामगिरी हवी,” असे ते म्हणाले. कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचे प्रमुख खेळाडू अपेक्षेप्रमाणे चमकू शकले नाहीत.

बाबर आणि शाहीन दोघेही प्रभाव पाडू शकले नाहीत, तर शादाबला ना गोलंदाजीत यश मिळाले ना फलंदाजीत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काही वक्तव्यांमुळे प्रशासनातही नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. भारताच्या विजयाने सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला, तर पाकिस्तानसमोर आता संघरचनेबाबत मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com