DC VS RR IPL 2025 : मिचेल स्टार्कची किमया अन् दिल्ली कॅपिटल्सचा 'सुपर' विजय, राजस्थानच्या हातचा डाव हुकला

DC VS RR IPL 2025 : मिचेल स्टार्कची किमया अन् दिल्ली कॅपिटल्सचा 'सुपर' विजय, राजस्थानच्या हातचा डाव हुकला

IPL 2025: मिचेल स्टार्कच्या किमयेने दिल्ली कॅपिटल्सचा विजय, राजस्थानचा पराभव
Published by :
Prachi Nate
Published on

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये तब्बल 4 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला आहे. यावेळी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 189 धावांचं लक्ष्य दिलं होत. दिल्लीने दिलेल्या धावांचा पाठलाग करत राजस्थान आणि दिल्लीमध्ये हा सामना टाय झाला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हरचा तुफानी सामना रंगला. दिल्लीने घरच्या मैदानावर राजस्थानचा पराभव करत विजय मिळवला. राजस्थान सहजपणे दिल्लीला पराभूत करून सामना जिंकेल असं वाटत असताना अचानक सामन्याने वेगळ वळण घेतलं.

सुपर ओव्हरसाठी खेळताना राजस्थानकडून सर्वप्रथम हेटमायर आणि रियान पराग मैदानात आले असता हेटमायरने दुसऱ्या बॉलवर चौकार लगावत, तिसऱ्या बॉलवर एक धाव घेतली. त्यानंतर चौथ्या बॉलवर रियान परागने चौकार मारला मात्र, तो नो-बॉल झाला. त्यानंतर हेटमायरने पाचव्या बॉलवर अधीक धावा घेण्यास पुर्ण प्रयत्न केले, मात्र त्यात तो अपयशी ठरला. अशाप्रकारे राजस्थानने दिल्लीसमोर 12 धावांचे आव्हान ठेवले. तर दुसरीकडे क्रिकेटमधील अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 12 धावांवर रोखलं. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने दिलेल्या 12 धावांवर दिल्लीने आपला विजय शिक्कामोर्तब केला.

यावेळी मिचेल स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानला अवघ्या 11 धावा करुन दिल्या. तर दुसरीकडे दिल्लीकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांच्या भागीदारीने दिल्लीला विजय मिळवून दिला. केएल राहुलने सर्वात आधी पहिल्या बॉलवर 2 धावा काढल्या तर दुसऱ्या बॉलवर चौकार मारत पुन्हा तिसऱ्या बॉलवर एक धाव घेतली. तर दुसरीकडे चौथ्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्जने जोरदार षटकार खेचला, अशा प्रकारे दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये 16 धावा करत शानदार विजय मिळला.

याचसोबत ज्यावेळी राजस्थानला शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती त्यावेळेस मैदानावर हेटमायर आणि ध्रुव जुरेल हे देघे उतरले होते. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्कनने पहिल्या 4 बॉलमध्ये प्रत्येकी 2-2 अशा धावा दिल्या. त्यानंतर स्टार्कन सातत्याने यॉर्कर्स टाकू लागला. स्टार्कनच्या यॉर्कर्सवर ध्रुवने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. त्यामुळे राजस्थानने देखील 188 धावा केल्या. एकीकडे दिल्लीने आपले 5 गडी गमावून 188 धावा करत राजस्थानला 189 धावांचे आव्हान दिले, तर दुसरीकडे राजस्थानने देखील आपले 4 गडी गमावून 188 धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे मिचेल स्टार्कन देखील दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com