DC VS RR IPL 2025 : अरेरे काय हे! संदीप शर्माच्या नावे अजब रेकॉर्ड जोडला, हे पाहून राहुल द्रविडच्या चेहऱ्यावर असंतोष
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याने रंग धरला. यावेळी दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये अपवादात्मक असा विजय पाहायला मिळाला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यादरम्यान दिल्लीने फलंदाजी करत 5 गडी गमावत राजस्थानला 188 धावांच आव्हान दिलं. तर या धावांचा पाठलाग करत राजस्थाने देखील 188 केल्या. ज्यामुळे हा सामना टाय झाला.
त्यामुळे तब्बल 4 वर्षांनंतर सुपर ओव्हर पाहायला मिळाली. सुरुवातीला गोलंदाजी करण्याच्या निर्णयात राजस्थानने शेवटच्या पाच ओव्हरमध्ये सर्वकाही गमावलं. शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानकडून आलेल्या संदीप शर्माने आपल्या नावे अजब आणि नकोसा रेकॉर्ड नोंदवला आहे. त्याने शेवटचे ओव्हर पुर्ण करण्यासाठी तब्बल 11 बॉल फेकले. एवढचं नव्हे तर त्याने फेकलेले बॉल हे 'WD,0,WD,WD,WD,2NB,4,6,1,1,', 'वाईड, शून्य, वाईड, वाईड, वाईड, २ नॉ बॉल, ४, ६, १, १, २ ' अशा प्रकारचे होते.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संदीप शर्माने सुरुवातीला चांगली मारा केला होता, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी थोडी बिघडली. त्याची ही गोलंदाजी पाहून कोच राहुल द्रविडच्या चेहऱ्यावर देखील असंतोष पाहायला मिळाला. तर या सामन्याच्या त्याच्या गोलंदाजीने तो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात ट्रोल होत आहे. इतकचं नव्हे तर तो कालच्या सामन्यात गोलंदाजी करायला विसरला की काय? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. त्याचसोबत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे देखील नाव जोडले गेले आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब ओव्हर टाकणारे गोलंदाज
तुषार देशपांडे, लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई, 2023 - 11 बॉल
मोहम्मद सिराज, मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरू, 2023 - 11 बॉल
संदीप शर्मा, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दिल्ली, 2025 - 11 बॉल