ENG vs IND : यशस्वी जयस्वालने दाखवली दमदार कामगिरी; 50 वर्षांनंतर ओपनर म्हणून केलं 'हे' काम

ENG vs IND : यशस्वी जयस्वालने दाखवली दमदार कामगिरी; 50 वर्षांनंतर ओपनर म्हणून केलं 'हे' काम

भारत आणि इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान केएल राहुलने विश्वविक्रमाला गवसणी घातली तर यशस्वी जयस्वालने 96 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत दमदार कामगिरी केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारत आणि इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान केएल राहुलने विश्वविक्रमाला गवसणी घातली तर यशस्वी जयस्वालने चेंडूत अर्धशतक पूर्ण करत दमदार कामगिरी केली. यशस्वी जयस्वालच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट विश्वात त्याची जोरदार चर्चा होत आहे. यशस्वी जैस्वालने मँचेस्टर कसोटीत शानदार फलंदाजी करत पहिल्याच डावात शानदार अर्धशतक झळकावलं आहेभारतीय क्रिकेटच्या 50 वर्षाच्या इतिहासात जे कधीच झाले नव्हते, ते आता यशस्वी जयस्वालने करून दाखवलं आहे.

मॅचेस्टरच्या मैदानात यशस्वी जयस्वालने अर्धशतक ठोकत नवा इतिहास रचला आहे. गेल्या 50 वर्षात आतापर्यत कोणत्याही भारतीय खेळाडूने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर अर्धशतक केले नव्हते. क्रिकेटच्या इतिहासात 50 वर्षानंतर सलामीवीर म्हणून अर्धशतक ठोकणारा यशस्वी जयस्वाल हा पहिला खेळाडू ठरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी जोरदार सुरुवात करत दोघांनीही विक्रम रचला.

खासकरून यशस्वी जयस्वालने यावेळी एक असा विक्रमर रचला आहे जो आतापर्यंत कोणालाही करता आला नाही. मैदानात भारताच्या एकाही सलामीवीराला कधीच अर्धशतक झळकावता आले नव्हते. हे स्वप्न यशस्वी जयस्वालने पूर्ण केले. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 58 धावांची दमदार खेळी केली. यशस्वी जयस्वालच्या या कामगिरीमुळे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरचा भारतीय खेळाडूंचा 50 वर्षांचा वनवास संपल्याचे चित्र आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com