Kusal Mendis Wicket, MI vs GT IPL2025 : बाईई काय ही 'विचित्र' विकेट! गुजरात टायटन्सच्या फलंदाजाने बॉल तर फटकारला मग OUT कसा झाला?

Kusal Mendis Wicket, MI vs GT IPL2025 : बाईई काय ही 'विचित्र' विकेट! गुजरात टायटन्सच्या फलंदाजाने बॉल तर फटकारला मग OUT कसा झाला?

मुंबई इंडियन्सकडून मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर कुसल मेंडिस क्रिजच्या एवढा आत गेला की त्याचा पाय स्टम्पवर लागून तो विचित्र पद्धतीने आऊट झाला.
Published by :
Prachi Nate
Published on

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत गुजरातसमोर 229 धावांच आव्हान ठेवलं. त्यानंतर गुजरातने 206 धावा केल्या ज्यामुळे त्यांचा मुंबई इंडियन्ससमोर पराभव झाला आणि त्यांचा आयपीएल 2025मधून माघार घ्यावी लागली. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या चक्रव्यू फिल्डींने गुजरात टायटन्सच्या कर्णधाराला ऐन मोक्याच्या सामन्यात माघारी पाठवले. मात्र यावेळी साई सुदर्शन, कुसल मेंडिस, वॉशिंग्टन सुंदर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान ज्यावेळेस साई सुदर्शनच्या सोबतीला कुसल मेंडिस मैदानात उतरला त्यावेळेस साई सुदर्शनला त्याची चांगली साथ मिळाली. साई सुदर्शनने अर्धशतकीय खेळी खेळत कुसल मेंडिससोबत 64 धावांची भागीदारी केली. मात्र ही साथ जास्त काळ टिकू शकली नाही. सातव्या ओव्हरला मुंबई इंडियन्सकडून मिचेल सँटनरने गोलंदाजी केल्या बरोबर कुसलने आडवा पट्टा मारण्याच्या प्रयत्न केला. जो फेल गेला, कारण या प्रयत्नात त्याचा पाय क्रिजच्या एवढा आत गेला की तो स्टम्पवर लागला ज्यामुळे तो आऊट झाला. मात्र ही विकेट फार विचित्र पद्धतीने मुंबईच्या मिचेल सँटनरने घेतली होती. ज्यामुळे तो 9 बॉलमध्ये 20 धावा करत बाद झाला.

यावेळी मुंबईकडून रोहित शर्माने 50 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी खेळली आणि गुजरातला धु-धु धुतला आहे. तर जॉनी बेअरस्टोने 22 बॉलमध्ये 47 धावांची शानदार फंदाजी केली. सुर्यकुमार यादवने 20 बॉलमध्ये 33 धावा करत रोहित शर्माला चांगली साथ दिली.

तर दुसरीकडे गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेत 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या. साई किशोर याने देखील दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. गेराल्ड कोएत्झीने 3 ओव्हरमध्ये 51 धावा दिल्या. फलंदाजीमध्ये गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हा अवघ्या 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने 50 बॉलमध्ये 80 धावा केल्या तर कुसल मेंडिस 9 बॉलमध्ये 20 धावा करत बाद झाला, त्याचसोबत वॉशिंग्टन सुंदर 24 बॉलमध्ये 48 धावांवर बाद झाला. गुजरातची ही तिगडी मैदानावर असेपर्यंत गुजरातला विजयाच्या आशा होत्या. मात्र मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने हुकमी एक्का बाहेर काढला आणि गुजरात संघ पंजाबच्या मैदानात माघारी फिरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com