Suresh Raina : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला EDची नोटीस; आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश
(Suresh Raina ) भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले असून, त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 1XBet नावाचे एक ऑनलाइन बेटिंग अॅप भारतात अवैध असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाल्याचे आरोप आहेत. सुरेश रैना या कंपनीच्या जाहिरातींमध्ये दिसल्यामुळे तो या प्रकरणाच्या चौकशीत ईडीच्या रडारवर आला आहे. यापूर्वी अभिनेता राणा दग्गुबती याचीही या प्रकरणात चौकशी झाली होती.
ईडी रैनाला या कंपनीशी त्याचा नेमका संबंध, जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या कराराची माहिती आणि संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा करणार आहे.
सध्या रैना क्रिकेटमधून निवृत्त असून समालोचन आणि विविध जाहिरातींमध्ये सक्रिय आहे. आज ईडीने चौकशीसाठी त्यांच्या दिल्ली कार्यालयात बोलावले असून या चौकशीत नेमकं काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.