क्रिकेट
Sourav Ganguly Car Accident : माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; सुदैवाने गांगुली सुरक्षित !
सौरव गांगुलीच्या कारचा अपघात झाला आहे, मात्र गांगुली सुरक्षित आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या कारला झालेल्या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.
माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या कारचा अपघात झाला आहे, मात्र सुदैवाने माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांना गंभीर दुखापत झाली नसून ते आता सुरक्षित आहेत. सौरव गांगुली यांच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे.
सौरव गांगुली यांच्या कारसमोर अचानक एक ट्रक आल्याने गांगुली यांच्या ताफ्यातल्या गाड्यांनी अचानक ब्रेक लावले. ब्रेक लावल्यामुळे ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. ज्यामुळे ताफ्यातल्या 2 गाड्यांचं मोठं नुकसान झाल आहे. पण गाडीतले सर्व प्रवाशी सुरक्षीत आहेत.