Shubman Gill Century : गिलने पुन्हा जिंकली भारतीयांची मनं! शतक पूर्ण करत बांगलादेशचा दारुण पराभव
हायब्रिड मॉडेलच्या आधारे आंततराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले असून दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतविरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यादरम्यान बांगलादेश या संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले होते.
या धावा पुर्ण करण्यासाठी सुरुवातीला मैदानात हिटमॅन आणि गिल या जोडीने 69 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रोहित फार काळ न टिकता 41 धावांवर माघारी परतला. मात्र, गिलने शेवटपर्यंत रोमांचक असा डाव खेळला. त्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या स्टार खेळाडूंनी गिलला साथ दिली.
त्यानंतर अखेर के एल राहुलसह मिळून गिलने कुठेही डगमगता शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याने त्याचे शानदार शतक पुर्ण करत टीम इंडियाचे 6 गडी राखून विजय मिळवून दिला. ज्यामुळे गिलने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं आहे.