Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकरच्या 'त्या' मागणीला सरकारकडून हिरवा कंदील; कोकाटेंचे थेट आदेश

महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. सरकारने सचिन तेंडुलकरच्या महिला खेळाडूंबाबत केलेल्या मागणीला तात्काळ हिरवा कंदील दाखवला आहे.

भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी महिला खेळाडूंच्या सन्मान, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व क्रीडा संकुले, जिमखाना व स्पोर्ट्स क्लब यांनी स्वतंत्र, सुरक्षित व आवश्यक सुविधायुक्त चेंजिंग रूम्स अनिवार्यपणे उपलब्ध करून द्याव्यात अशी महत्वपूर्ण मागणी सरकारकडे केली होती.

त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते सरकार ऑन ऍक्शन मोड आलं असून महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्राचा मोठा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर यांच्या आव्हानाला आता क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हिरवा कंदील दाखवत सचिन तेंडुलकरने केलेल्या मागणीला मान्यता देत थेट आदेश काढले आहेत.

या सुविधा आता महाराष्ट्रभर करण्यासाठी तसे निर्देश काढण्यात आले आहेत. राज्यातील सर्व तालुका जिल्हा विभागीय क्रीडा संकुलं जिमखाने स्पोर्ट्स क्लब यांची लवकरच अंमलबजावणी होणार. हा निर्णय घेणे महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारचा महत्त्वाचा पाऊल ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com