Harmanpreet Kaur : "...याबद्दल मी माफी मागते" विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधारने मागितली माफी; पण ती व्यक्ती कोण?

Harmanpreet Kaur : "...याबद्दल मी माफी मागते" विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधारने मागितली माफी; पण ती व्यक्ती कोण?

विश्वचषक ट्रॉफी स्वीकारल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणाची तरी माफी मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत.
Published by :
Prachi Nate
Published on

नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना खेळवला गेला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक 2025चं जेतेपद पटकावलं. यावेळी त्यांनी माजी भारतीय खेळाडूंना देखील त्यांच्या विजयी जल्लोषात सामील केले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम तिच्या सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला. यावेळी तिने कोणाची तरी माफी मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय महिला संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर सहकाऱ्यांनी माजी भारतीय खेळाडू अंजुम चोप्रा, मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना विश्वचषक ट्रॉफी दाखवली.

त्यावेळी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना झुलन गोस्वामीची माफी मागत म्हणाल्या की, "गेल्या वेळी तुम्हाला विश्वचषक जिंकता आला नाही याबद्दल मी माफी मागते." यामुळे अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी भावुक झाली. सर्व खेळाडूंनी या दिग्गजांना मिठी मारली तेव्हा तो एक संस्मरणीय क्षण होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

याचपार्श्वभूमिवर झुलन गोस्वामी तिच्या सोशल मीडियावर भावना व्यक्त करत म्हणाली की, "हे माझे स्वप्न होते आणि तुम्ही ते सत्यात उतरवले. शफाली वर्माच्या ७० धावा आणि दोन मोठ्या विकेट्स, दीप्ती शर्माचे अर्धशतक आणि पाच विकेट्स... दोन्हीही अद्भुत. ट्रॉफी आता आमची आहे."

तसेच भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार मिताली राजने म्हटलं की, "मी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हे स्वप्न पाहत आहे की, भारतीय महिलांनी विश्वचषक ट्रॉफी उचलताना पाहावे. आज रात्री, ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. २००५ च्या हृदयविकारापासून ते २०१७ च्या लढाईपर्यंत, प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग, आपण येथे आहोत असे मानून बॅट उचलणारी प्रत्येक तरुणी, या सर्वांमुळे हा क्षण आला. जागतिक क्रिकेटच्या नवीन विजेत्यांना, तुम्ही फक्त ट्रॉफी जिंकली नाही, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी धडधडणारे प्रत्येक हृदय जिंकले. जय हिंद..."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com