IND vs PAK : "पाकिस्तान भारताचा पराभव करेल" IIT बाबांनी केली भविष्यवाणी, भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आनंदात मिठाचा खडा
सध्या सर्वत्र चॅम्पियन्स ट्रॉफीचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून भारताने 231 धावांसह पराभव केला. असं असताना आता 23 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा थरार रंगणार आहे. या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे.
अशातच महाकुंभमेळ्यात प्रसिद्धी मिळवलेल्या IIT बाबाने अनोखी भविष्यवाणी केली आहे. या बाबाच्या भविष्यवाणीमुळे बाबा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले दिसून येत आहे. मात्र, यावेळेस बाबांवर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींचा आक्रोश पाहायला मिळत आहे. बाबाने नेमकी अशी कोणती भविष्यवाणी केली जाणून घ्या. एका युट्यूब चॅनलला मुलाखत देत असताना IIT बाबा अभय सिंहने एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
बाबा म्हणाले की, "यावेळी भारताचा पाकिस्तानसमोर टिकाव लागणार नाही. विराट कोहली किंवा रोहित शर्मा याने कितीही प्रयत्न केले तरी भारत ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार नाही. मी म्हणतोय नाही जिंकणार तर नाही जिंकणार भारत हा सामना, देव मोठा आहे की तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं ते करा पण भारत हा सामना जिंकण कठीण आहे. पाकिस्तान भारताचा पराभव करेल. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा मी जिंकून दिली होती, मी रोहितला सांगितलं होतं की, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. पण आता सगळ उलट केल आहे मी, यावेळेस भारत हरणार".
त्यांच्या या भविष्यवाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यांच्या या भविष्यवाणीवर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरते की खोटी ते 23 तारखेलाच कळेलच. मात्र, एकीकडे भारतीय क्रिकेटप्रेमी खुश असताना दुसरीकडे IIT बाबा मात्र आनंदात मिठाचा खडा टाकण्याचं काम केल आहेत.