ENG Vs IND : इंग्लंडच्या खेळाडूची भेदक गोलंदाजी! जैस्वालच्या बॅटचे केले दोन तुकडे, Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
इंग्लड दौऱ्यादरम्यानचा भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. यादरम्यान इंग्लंडचा कर्णधान बेन स्टॉक्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली.
यावेळी भारताकडून सर्वात आधी सलामवीर म्हणून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल हे मैदानात उतरले. या सामन्यात 9व्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने टाकलेला चेंडू हा चेंडू नसून तोफातून सोडलेल्या आगीच्या गोळ्याप्रमाणे निघाला. क्रिस वोक्सने टाकलेल बॉल थेट बॅटच्या हँडलला लागला ज्यामुळे टीम इंडियाच्या यशस्वी जैस्वालच्या बॅटचे थेट दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाल. यानंतर यशस्वी जैस्वाल देखील काही वेळ बॅटचे झालेले तुकडे पाहत राहिला.
त्यानंतर काही क्षणातच करुण नायर 3-4 बॅट घेऊन मैदानात धावत आला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान भारताकडून केएल राहुल 40 धावांवर आणि यशस्वी जैस्वाल 36 धावांवर नाबाद होता. तर भारताच्या 26 षटकात बिनबाद 78 धावा झाल्या होत्या. सध्या इंग्लंड 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग 11
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.
टीम इंग्लंडची प्लेइंग 11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.