RCB vs PBKS IPL 2025 Final : आरसीबीला सर्वात मोठा धक्का! 6 मारायला गेला अन् किंग कोहली बाद
आज आयपीएल 2025 स्पर्धेचा महाअंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. तर या सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरु या दोन्ही संघाच्या चाहत्यांची धाकधुक वाढलेली आहे. कारण, दोन्ही संघांसाठी आयपीएल 2025 चा विजय हा पहिला विजय असणार आहे. यावेळी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आरसीबीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली. आरसीबीकडून ओपनिंगला विराट कोहली आणि त्याच्यासोबतीला फिल सॉल्ट फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सॉल्टची पहिली विकेट गेल्याबरोबर आरसीबीला पहिला धक्का बसला.
सॉल्ट 16 धावांवर बाद झाला त्याला अय्यरने शानदार कॅच पकडत बाद केले. त्यानंतर कोहली-पाटीदारच्या जोडीने 10 ओव्हरमध्ये 87 धावांचा पल्ला गाढला. त्यानंतर 12 ओव्हरमध्ये आरसीबीने 100 पार केले. अखेर 15 व्या ओव्हरमध्ये अझमत उमरझाई गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पाचव्या बॉलवर विराट कोहलीने पुलशॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल उंच उडाला. त्यानंतर उमरझाई चपळाईने पुढे धावत गेला आणि त्याने विराटला अफलातून झेल घेत बाद केले. मात्र यावेळेस विराटला आपला अर्धशतक देखील पुर्ण करता आला नाही. तो 35 बॉलमध्ये 3 चौकारांसह 43 धावा करत माघारी परतला. यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.