IND vs AUS: जडेजासह केएल राहुलची चमकदार खेळी, तर आकाशच्या गगनचुंबी शॉटवर कोहलीची रिअॅक्शन
बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या तिसऱ्या कसोटीत केएल राहुलने दमदार खेळी खेळली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघ सतत विकेट गमावत होता. तर दुसरीकडे केएल राहुलने एका बाजूने हा डाव धरून ठेवला होता.
केएल राहुलने फलंदाजी करताना 139 बॉलमध्ये 8 चौकारांसह 84 धावा केल्या. त्याला रविंद्र जडेजाने मजबूत साथ दिल्याच पाहायला मिळाली. रविंद्र जडेजाने 123 बॉलमध्ये 77 धावांसह उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि शेवटी आकाशदीप- बुमराहच्या जोडीमुळे फॉलोऑन टळला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 246 धावा करायच्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि आाकाश दीपने 39 धावांची भागीदारी करत संघावर असलेलं फॉलोऑनचं संकट टाळलं. या डावात भारतीय संघाचा डाव गडगडला होता. या खेळाडूंनी मिळून भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.