IND VS PAK Champions Trophy 2025: ठरलं तर! 'या' दिवशी भिडणार IND VS PAK आमनेसामने, कोण मारणार बाजी ?

IND VS PAK Champions Trophy 2025: ठरलं तर! 'या' दिवशी भिडणार IND VS PAK आमनेसामने, कोण मारणार बाजी ?

IND VS PAK चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना 'या' दिवशी होणार, कोणता संघ जिंकणार?
Published by :
Team Lokshahi
Published on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्या लढतीची तारीख समोर आली आहे तर पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीतील 10 सामने आयोजित केले जातील अशी माहिती समोर आली आहे. आयसीसीकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे कायम असले तरी भारताचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार होतील. आठ संघांची वन डे स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 9 मार्चला अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीतील 10 सामने आयोजित केले जातील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे?

हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे तीनही साखळी सामने तटस्थ ठिकाणी होतील 23 फेब्रुवारी २०२५ मध्ये खेळवण्यात येतील, तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबो किंवा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला जाण्याची शक्यता आहे. हे सामने दुबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे.

तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमधील तीन स्टेडियममध्ये होणार असून रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे हे सामने होतील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला, तर उपांत्य आणि अंतिम सामने देखील तटस्थ ठिकाणी होतील. जर भारजीय संघ या स्पर्धेतून बाद झाला, तर हे सामने पाकिस्तानच्या लाहोर आणि रावळपिंडीमध्ये होतील.

कोणत्या संघांचा समावेश असणार

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांचा समावेश असणार असून त्यांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आमनेसामने खेळवल जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com