KL Rahul Baby : के. एल. राहुलच्या घरी चिमुकलीचं आगमन ; IPL सुरु असतानाच चाहत्यांना दिला सुखद धक्का

KL Rahul Baby : के. एल. राहुलच्या घरी चिमुकलीचं आगमन ; IPL सुरु असतानाच चाहत्यांना दिला सुखद धक्का

याबद्दलची माहिती आथिया आणि राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आयपीएलला जोरदार सुरुवात चांगलीच झाली आहे. अशातच आता के.एल. राहुलबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांच्या घरी पाळणा हलला आहे. आथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबद्दलची माहिती आथिया आणि राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

गेल्या वर्षी आथिया आणि राहुल यांनी आई-वडील होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना बाळ जन्माला येण्याची उत्सुकता लागली होती. मुलगी झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच कियारा आडवाणी. अर्जुन कपूर यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2023 साली केएल राहुल आणि आथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले होते. खंडाळा येथील फर्महाऊसमध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंब आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com