IPL 2025 LSG New Captain: आयपीएल 2025 च्या सर्वात महागडा खेळाडू झाला लखनऊचा नवा कर्णधार

IPL 2025 LSG New Captain: आयपीएल 2025 च्या सर्वात महागडा खेळाडू झाला लखनऊचा नवा कर्णधार

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 साठी ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडले आहे. आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ऋषभला संघात घेऊन मोठी जबाबदारी दिली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

आयपीएल 2025 च्या लिलावात श्रेयस अय्यरनंतर ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला लखनौने ऋषभसाठी २७ कोटी ही किंमत ठेवली आणि ऋषभला आपल्या संघात घेतले. त्यामुळे आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर आता लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा आयपीएल 2024चा कर्णधार केएल राहुल होता. मात्र आता केएल राहुलची रिप्लेसमेंट म्हणून रिषभ पंतला संघात घेतलं आणि रिषभ पंतच्या नेतृत्व संघाची खेळी पाहायला मिळणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संघमालक संजीव गोयंका यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल २०२५ साठी संघ

ऋषभ पंत, निकोलस पूरन, आर्यन जुयाल, आकाश दीप, शमार जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, डेव्हिड मिलर, एडन माक्ररम, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, अब्दुल समद.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com