IPL 2025 Opening Ceremony : IPL 2025 ची जंगी ओपनिंग सेरेमनी! 'या' बॉलिवूडच्या ताऱ्यांची मांदियाळी

IPL 2025 Opening Ceremony : IPL 2025 ची जंगी ओपनिंग सेरेमनी! 'या' बॉलिवूडच्या ताऱ्यांची मांदियाळी

IPL 2025 च्या जंगी ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडच्या ताऱ्यांची मांदियाळी! श्रेया घोषाल, दिशा पटानी आणि करण औजला यांच्या सादरीकरणाने रंगणार सोहळा. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर.
Published by :
Prachi Nate
Published on

संपुर्ण देशभरात ज्याची क्रिकेटप्रेमी वाट पाहतात असा आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 2025 ला अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम आहे. या हंगामाचा पहिला सामना हा शनिवारी 22 मार्च म्हणजेच आजा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे.

मागच्या पर्वातील विजेतेपद कोलकत्ता नाईट रायडर्सने जिंकले होते. केकेआर संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी मराठमोळा खेळाडू अंजिक्य रहाणे याच्या खांद्यावर आहे, तर आरसीबीच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रजत पाटीदार याच्याकडे आहे. या हंगामात दोन्ही संघाना नवीन कर्णधार मिळाले असून नव्या नेतृत्त्वाची कसोटी पाहायला मिळणार आहे.

आयपीएल 2025 चे रंगतदार उद्घाटन

तर याचपार्श्वभूमिवर आज IPL 2025 चा जंगी ओपनिंग सोहळा संध्याकाळी 6.00 वाजता पार पडणार आहे. आयपीएल 2025 चा उद्घाटन समारंभ स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहता येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला क्रिकेटविश्वातले सगळे प्रमुख खेळाडू भारतात दाखल झाले असून त्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.

त्याचसोबत काही बॉलिवूड स्टार देखील या सोहळ्यादरम्यान आपली उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तसेच पंजाबी गायक करण औजला अशा तारांकित लोकांचे सादरीकरण या उद्घाटन सोहळ्यात रंगणार आहे. या कार्यक्रमानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com