IPL 2025 Final : 'Operation Sindoor'सन्मान, गाणी आणि थरार ! जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार समारोप समारंभ ?

IPL 2025 Final : 'Operation Sindoor'सन्मान, गाणी आणि थरार ! जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार समारोप समारंभ ?

ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर रंगणार आयपीएल 2025 समारोप समारंभ
Published by :
Shamal Sawant
Published on

आयपीएल 2025 चा अंतिम सामना मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. लीगच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पंजाबने क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटरमध्ये गुजरातला हरवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. पंजाब आणि बंगळुरू पहिल्या हंगामापासून लीगचा भाग आहेत, परंतु पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्यात त्यांना अपयश आले आहे. या सामन्यापूर्वी एक समारोप समारंभ देखील होईल, ज्यामध्ये शंकर महादेवन सादरीकरण करताना दिसतील.

आयपीएल 2025 च्या समारोप समारंभाची थीम ऑपरेशन सिंदूर असेल. बीसीसीआयने तिन्ही लष्कर प्रमुखांना समारोप समारंभासाठी आमंत्रित केले होते, परंतु ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. समारंभात संपूर्ण स्टेडियम तिरंग्याच्या रंगात रंगवले जाईल आणि या वेळी गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल.

कधी होणार समारोप समारंभ ?

आयपीएल 2025 चा समारोप समारंभ 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएलच्या समारोप समारंभात शंकर महादेवन सादरीकरण करताना दिसतील. समारोप समारंभात ते ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सैनिकांना त्यांच्या गाण्यांनी सन्मानित करताना दिसतील.

कुठे आणि कधी लाईव्ह पाहू शकता ?

आयपीएल समारोप समारंभ स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ-हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तसेच समारंभ किती वाजता सुरू होईल आयपीएलचा समारोप समारंभ सामना टॉस होण्याच्या एक तास आधी सुरू होईल. आयपीएलनुसार, समारोप समारंभ संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com