Jasprit Bumrah : 'या' कारणामुळे जसप्रीत बुमराहने कसोटी संघाचे कर्णधार पद नाकारले, स्वतःच केला खुलासा
भारतीय कसोटी संघामध्ये मोठे बदल झालेले दिसत आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली . मात्र रोहितच्या कर्णधारपदाच्या काळात जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदी होता. आता बुमराह कर्णधार बनणार असं वाटत असताना अचानक बुमराह याने स्वतःहून कर्णधार पद नाकारले आणि त्यामुळे शुभमन गिल याच्याकडे हे कर्णधारपद गेले. बीसीसीआय ला याबाबत स्वतः फोन करून जसप्रीत बुमराह याने कसोटी संघाचे कर्णधार पद नाकारले.
भारतीय कसोटी संघ एका मोठ्या बदलातून जात आहे. रोहित शर्माने आणि विराट कोहली ने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आणि त्यानंतर बीसीसीआय कडे जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि ऋषभ पंत असे तीन पर्याय होते. मात्र वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला . 2022-23 मध्ये तो दुखापतीमुळे जवळजवळ एक वर्ष मैदानापासून दूर होता.या दुखापतींमुळे बुमराहच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.
जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याला पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी चार महिने लागले.त्यामुळे त्याने स्वतःच्या फिटनेस टीम बरोबर या बाबत चर्चा केली. आणि त्याने त्याच्या पाठीवर ताण येऊ नये यासाठी त्याने स्वतः बीबीसीआय अधिकाऱ्यांना याबाबत फोन करून कर्णधार पदासाठी नकार कळवला.
गेल्या काही वर्षांत पाठीच्या दुखापतीने बुमराहला खूप त्रास दिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी मालिकेच्या वेळी ,शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह बाहेर निघाला होता. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत, बुमराह याने पुढचा विचार करून हे कर्णधारपद सोडल्याचे सांगितले. कर्णधार पदाच्या या शर्यतीत जसप्रीत बुमराह ने संघाच्या विजयला महत्व देत इतकी मोठी ऑफर नाकारली. त्यामुळे आता आता इंग्लंड दौऱ्यामध्ये शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.