Virat Kohli : कोहलीच्या 'या' पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ
थोडक्यात
‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा?
कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ
आता भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीचा देखील समावेश करण्यात आला आहे. नुकतंच भारतीय संघ या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होताच विराट कोहलीने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कोहलीच्या या पोस्टनंतर चाहते अनेक प्रकारे अर्थ लावत आहे.
एक्सवर विराट कोहलीने (Virat Kohli) लिहिले की, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच तुम्ही खरोखर अपयशी ठरता. कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर आता व्हायरल होत असून चाहते अनेक प्रकारचे अर्थ लावत आहे. तर दुसरीकडे कोहली आता निवृत्तीची तयारी करत आहे असं काहीजण म्हणत आहे. तर कोहली आता 2027 च्या विश्वचषकासाठी तयारी करणार आहे असं काहीजण म्हणताना दिसत आहे.
विराट कोहली भारतीय संघासह 15 ऑक्टोबर रोजी भारतीय संघासह ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. भारतीय संघ 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 नंतर विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर मे 2025 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहली यावर्षी भारताकडून खेळताना दिसला आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आता तो 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या खेळताना दिसणार आहे.
एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
19 ऑक्टोबर – पहिला एकदिवसीय, पर्थ
23 ऑक्टोबर – दुसरा एकदिवसीय, अॅडलेड
25 ऑक्टोबर – तिसरा एकदिवसीय, सिडनी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि यशस्वी जयस्वाल.