M.S. Dhoni CSK : "CSK सोबतचं नात पुढील 15-20 वर्ष, पण..." धोनीने स्पष्टचं केलं!अजून किती वर्ष संघासाठी खेळणार? जाणून घ्या...
आयपीएल 2025नंतर आयपीएल 2026 ची देशभरात उत्सुकता लागली आहे. यादरम्यान सर्वाधिक चर्चेत असलेला संघ CSK, या संघाने मागील काही वर्षात आपली चांगली कामगिरी दाखवली नाही. इतकेच नव्हे तर आयपीएल 2025मध्ये CSK संघ पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटी पाहायला मिळाला.
आयपीएलची चाहुल लागली की, चर्चा होते ती महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीची. 44 वर्षीय धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू आहेत. मात्र धोनी प्रत्येकवेळेस मैदानावर उतरत आपल्या चाहत्यांना आनंदी धक्का देतो. आयपीएल 2025 मध्ये धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे CSK संघाकडून त्याची निराशजनक कामगिरी पाहायला मिळाली.
सध्या धोनीची एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. ज्यात त्याने फ्रँचायझीसोबतची त्याची पुढील योजना काय आहे? यावर भाष्य केलं आहे. यावेळी धोनीने सांगितले की,"मी भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी कोणतीही घाई करणार नाही, याबद्दल मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे.
माझं CSK सोबतचं नात पुढील 15-20 वर्ष कायम टिकून राहणार आहे. पण मी असं म्हणालो म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, मी पुढील 15-20 वर्ष खेळत राहिन. त्यामुळे हे तक्र वितक्र फ्रँचायझीने लावू नये. माझं फ्रँचायझीसोबतचं नातं वेगळ आहे. मी तुम्हाला नेहमीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसेन. मग मी खेळत असो किंवा नसो. ही एक-दोन वर्षांची गोष्ट नाही. " असं देखील महेंद्र सिंह धोनीने म्हटलं आहे.