Mohammed Shami Daughter : शामीनंतर आता त्याची लेक ट्रोलर्सच्या कचाट्यात! मुलगी होळी खेळल्याने नवा वाद

Mohammed Shami Daughter : शामीनंतर आता त्याची लेक ट्रोलर्सच्या कचाट्यात! मुलगी होळी खेळल्याने नवा वाद

शामीनंतर आता त्याची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर! मुलगी होळी खेळल्याने सोशल मीडियावर नवा वाद निर्माण
Published by :
Prachi Nate
Published on

नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मुस्लिम बांधवांचा रोजाचा उपवास सुरु होता यादरम्यान मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळत असल्यामुळे त्याने एनर्जी ड्रिंक पितानाचे फोटो व्हायरल झाले होते. यावर काही मौलवींनी नाराजी व्यक्त केली होती. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवीने घणाघाती टीका केली होती. मौलवीच्या मते, रोजा न ठेवल्याने मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केल्याचं सांगितलं होतं. असं असताना आता शामीच्या मुलीवर देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळत आहेत.

काल देशात अनेक अनेक ठिकाणी रंगपंचमी साजरी केलेली पाहायला मिळाली. याचपार्श्वभूमिवर भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामी याच्या लेकीने देखील होळी खेळल्याचे फोटो त्याच्या एक्स पत्नीने म्हणजेच हसीन जहाँने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काल पोस्ट केले होते. शमीची मुलगी होळीच्या गाण्यावर बिंधास्त नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ डान्स क्लासमधला असल्याचं कळत आहे. पण हा व्हिडीओ पाहूनही ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. यानंतर मात्र नव्या वादाला ठिणली लागली. या पोस्ट दरम्यान काही मुस्लिमांनी शामीच्या मुलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुस्लिम असूनही रमझान महिन्यात होळी खेळणं गुन्हा असल्याचं सांगितलं.

तसेच काहींनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, रमझानचा महिना आहे आणि असं करताना लाज वाटत नाही का? तसेच एकाने त्यांच्या मुस्लिम असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मात्र, अस असून देखील दुसरीकडे हिंदू बांधवांनी शामीच्या मुलीला आणि शामीला पुर्ण प्रोत्साहन देत त्यांची बाजू घेतली आहे. प्रत्येक टीकेच्या कमेंटवर हिंदूंकडून प्रत्योत्तर देण्यात आल्याच दिसून येत आहे. त्यामुळे शामीच्या आणि त्याच्या मुलीच्या मागे संपुर्ण हिंदू समाज खंबीर उभ असल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com