MI Vs GT IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या विजयात रोहित शर्मा ठरला 'हिट'मॅन, तुफानी फलंदाजीसह क्वालिफायर 2 मध्ये एन्ट्री
(Rohit Sharma) 30 मे 2025 ला पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढवला गेला. या सामन्यादरम्यान मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे गुजरातकडून गोलंदाज मैदानात उतरले.
यावेळी मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावत 228 धावा केल्या आणि गुजरातसमोर 229 धावांच आव्हान ठेवलं. जे पुर्ण करण्यात गुजरात अपयशी ठरली. गुजरातने फलंदाजी करत 6 गडी गमावत 206 धावा केल्या ज्यामुळे त्यांचा मुंबई इंडियन्ससमोर पराभव झाला आणि त्यांचा आयपीएल 2025मधून माघार घ्यावी लागली. तर मुंबई इंडियन्स या विजयासह थेट क्वालिफायर 2 मध्ये गेली. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात क्वालिफायर 2 मध्ये फायनलचं तिकिट गाठण्यासाठी लढत पाहायला मिळणार आहे.
यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो हे मैदानात उतरले, जॉनी बेअरस्टोने 22 बॉलमध्ये 47 धावांची धमाकेदार खेळी खेळली, यानंतर सुर्यकुमार यादवने 20 बॉलमध्ये 33 धावा करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. त्यानंतर तिलक वर्माने 11 चेंडूत 25 धावा केल्या मात्र त्याच्या साथीने रोहित शर्माने 50 बॉलमध्ये 81 धावांची खेळी खेळत गुजरातला धु-धु धुतला आहे.
यादरम्यान रोहिते 50 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकार मारले. आयपीएलच्या इतिहासात तब्बल 300 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचसोबत विराट कोहलीनंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये 7000 हून अधिका धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आपलं नाव कोरल आहे. विराटने 8618 धावा केल्या आहेत, तर रोहितच्या नावावर 7003 धावा आहेत.