Nitish Reddy Century: लेकाच्या सेंच्युरीवर वडिलांना अश्रू अनावर! नितीश रेड्डी ठरला पहिल्या डावाचा हिरो
ऑस्ट्रेलियाच्या मैदानात नितीश कुमार रेड्डीने वयाच्या 21 व्या वर्षी 171 चेंडूत शतक पूर्ण करत स्वतःच्या नावाचा दणका ऑस्ट्रेलियाला दिला आहे. ऑस्ट्रेलियात शतकी खेळी करणारा नितीश रेड्डी तिसरा तरूण फलंदाज ठरला आहे. याआधी सचिनने 1992 मध्ये सिडनीच्या मैदानावर वयाच्या 18 व्या वर्षी शतकी खेळी केली होती.
यानंतर नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानात शानदार शतक झळकवत आपली ओळख निर्माण केली आहे. मेलबर्नच्या मैदानात 80 हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर त्याच्या शतकाने भारतीय क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. एवढ्या लोकांसमोर त्याने दणदणीत शतक पुर्ण केलेलं पाहून त्याच्या वडिलांही मैदानात अश्रू अनावर झाले. त्याने स्वतःसह वडिलांचे देखील स्वप्न या शतकाने सत्यात उतरलं.
नितीश कुमार रेड्डीचं दणदणीत शतक
भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना खेळत असताना तो शांतपणे आणि संयमाने आपली खेळी खेळताना दिसला. त्याने 176 बॉलमध्ये आपली सेंच्युरी पुर्ण केली आहे. सुरुवातीला नितीश कुमार रेड्डीच्या फलंदाजीने टीम इंडियाचा डाव फसलेला होता. मात्र जडेजाच्या सोबत त्याने ३० धावांची भागीदारी केली.
वॉशिंग्टन सुंदर मैदानात आल्या बरोबर त्याची साथ नितीश रेड्डीसाठी डाव फिरवणारी ठरली. या जोडीने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना ८ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. नितीश रेड्डीने शतक पूर्ण केलं, तर वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी करत, दोघांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.