Rishabh Pant ENG Vs IND : ऋषभ पंतची इंग्लंड कसोटीतून एक्झिट, 'या' खेळाडूला संधी; संघात मोठे बदल
इंग्लड दौऱ्यादरम्यानचा भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडल?
चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा जलद गोलंदाज ख्रिस वोक्स याच्या एका वेगवान चेंडूचा सामना करताना पंतने धोकादायक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तोच त्याच्या पायावर बसला. ही घटना सामन्याच्या पहिल्याच दिवशी घडली. चेंडू थेट पायावर आदळल्यामुळे पंतला तीव्र वेदना झाल्या आणि लगेचच त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली. डॉक्टरांनी निरीक्षण केलं असता, त्याच्या मोज्यांमधून रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं. पायाला सूज आणि रक्तस्राव असल्याने त्याची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले आहे.
ऋषभ पंतची जागा कोण घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये आणि टीम इंडियामध्ये यष्टीरक्षक फलंदाज असलेला इशान किशन याला पाचव्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतच्या जागी संघात बोलवण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. इशान किशन गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. सध्या इशान किशन हा नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी होता. यादरम्यान त्याची दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह उत्तम खेळी पाहायला मिळाली. इशान किशनने आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले असून त्याने 3 डावांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 78 धावा केल्या आहेत.