Rohit Sharma : रोहित आणि रितिकाची नवी ओळख! लहानग्यांच्या 'या' कंपनीचे बनले ब्रँड अॅम्बेसेडर
क्रिकेट विश्वातील नावाजलेला चेहरा म्हणून रोहित शर्मा हे नाव गाजलेलं आहे. रोहित शर्माचे जगभरात लाखोंच्या संख्येने चाहतावर्ग आहे. दरम्यान टी 20 क्रिटेकमधून त्याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याला पुन्हा कधी क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहायला मिळणार यासाठी रोहित शर्माचे चाहते उत्सुक झाले आहेत.
दरम्यान रोहित शर्माने त्याची नवी ओळख आता पुन्हा सर्वांसमोर आणली आहे. रोहित शर्मा आता एका ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ओळखला जाणार आहे. यामध्ये त्याची पत्नी रितिका सजदेह हिचा देखील सहभाग असणार आहे. सेटाफिलने त्यांच्या सेटाफिल बेबीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचं नाव घोषित केले आहे.
त्यामुळे हे दोघे सर्व प्लॅटफॉर्मवर सेटाफिल बेबीचे समर्थन करताना दिसतील. सेटाफिल बेबी ब्रँड हे बाळांच्या त्वचेची काळजी घेण्यावर केंद्रित उत्पादनांची श्रेणी आहे. सेटाफिल बेबी उत्पादनांची श्रेणी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आहे. त्यांनी पालक आणि बालरोगतज्ञांचा विश्वास जिंकला आहे. उत्पादनांची श्रेणी बेबी बाथिंग बारपासून ते वॉश आणि शॅम्पू, लोशन आणि डायपर क्रीम, मसाज ऑइल इत्यादींपर्यंत पसरलेली आहे.
तसेच सेटाफिल बेबी ब्रँड यावर म्हणाले की, "रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचे सेटाफिल बेबी कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हे दोघे जबाबदाऱ्या संभाळून त्यांच्या मुलाच्या कल्याणाला प्राधान्य देऊन आधुनिक पालकत्वाच्या भावनेला पुरेपुर रूप देतात. या भागीदारीद्वारे, आम्हाला भारतातील पालकांना त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह राहण्यासाठी मदत करेल".
यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, " माझ्या प्रवास आणि प्रशिक्षण वेळापत्रकामुळे, माझ्याकडे मुलांसोबत घरी घालवण्यासाठी फारसा वेळ नाही. मी हे स्पष्ट करतो की जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी मुलांसोबतच्या सर्व क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे सहभागी होतो, मग ते मजा असो किंवा काळजी घेणे असो. जेव्हा सेटाफिल बेबीने आम्हाला सांगितले की तरुण पालक त्यांच्या बाळांचे संगोपन कसे करतात, तेव्हा ते जोडपे म्हणून आणि पालक म्हणून आमच्या वास्तवाशी पूर्णपणे जुळले. आम्ही आमच्या दोन्ही मुलांसाठी सेटाफिल बेबी वापरत आहोत."