Rohit Sharma Century: हिटमॅनची तुफानी खेळी! रोहितनं सेंच्युरीसह मैदान गाजवलं

Rohit Sharma Century: हिटमॅनची तुफानी खेळी! रोहितनं सेंच्युरीसह मैदान गाजवलं

रोहित शर्माची तुफानी खेळी! इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने आपल्या वनडे कारकिर्दीतील 32वे शतक पूर्ण केले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रोहित शर्माने झंझावाती आणि वादळी फलंदाजी करत ट्रोलर्सची केली बोलती बंद केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना कटकच्या मैदानावर पार पडला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वनडे कारकिर्दीतील 32वे शतक पूर्ण केले आहे. हिटमॅन त्याच्या फॉर्मच्या शोधात होता. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये रोहित त्याला हवी तशी कामगिरी करु शकला नाही. ज्यामुळे त्याला सोशल मीडियवर अनेक वेळा ट्रोलर्सकडूम ट्रोल करण्यात आलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रोहित शर्माने झंझावाती आणि वादळी फलंदाजी करत ट्रोलर्सची केली बोलती बंद केली आहे. रोहितने 76 बॉलमध्ये 7 तुफानी षटकार 9 चौकार मारत 101 धावा पूर्ण केल्या असून आपल्या वनडे कारकिर्दीतील 32 वे शतक पूर्ण केले, तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला 305 धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हाला सामोरे जात रोहितने त्याची बॅट तापवली. यावेळी रोहित शर्माला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. या जोडीने सुरुवातीच्या षटकापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजीवर तुफानी खेळी खेळली. शुभमनने 60 धावांची खेळी खेळली तर रोहितने 119 धावांवर माघार घेतला. असं करत दोघांनी मिळून 136धावांची भागीदारी केली. या खेळीसह रोहितने आपला फॉर्म गाजवला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com