Rohit Sharma: "डोकं कुठे असतं तुझं?" कारवरील डेंट पाहून रोहित शर्माचा राग अनावर; Video Viral
भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या नावे मुंबईच्या वानखेडे मैदानावर स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी रोहित शर्माचं पुर्ण कुटुंब त्याठिकाणी उपस्थित होत. त्याने त्याच्या आई-वडिलांची ज्या पद्धतीने काळजी घेत होता, ते पाहून त्याचे चाहते भारावले. मात्र यावेळी कार्यक्रम उरकून स्टेडियमबाहेर पडताना कारवरील डेंट पाहून रोहित शर्माचा अँग्री ब्रदर वाला वेगळाच अंदाज पाहायला मिळालं.
वानखेडेवरील रोहित शर्माच्या स्टॅन्डचं उदघाटन पार पडल्यानंतर रोहित स्टेडिअमबाहेर पडत होता. त्यावेळी त्याच लक्ष कारच्या मागच्या बाजूला पडलेल्या डेंटवर गेलं. यावरुन रोहितने त्याच्या लहान भावाला चांगलच झापलेलं पाहायला मिळालं. रोहित शर्मा हा कार लव्हर आहे, त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे.
त्यावेळी रोहित त्याचा भाऊ विशालला म्हणाला की, हे काय आहे? यावर विशाल म्हणाला, पार्किंग करताना रिवर्स घेत्यावेळी कारच्या मागच्या बाजूस डेंट आला आहे. यावर पुन्हा रोहित म्हणाला, कोणामुळे, तुझ्यामुळे का? यावर विशालने हो असं उत्तर दिल. त्याने दिलेल्या होकारार्थी उत्तरावर रोहितचा भडका उडाला आणि रोहित त्याच्या भावाला म्हणाला की, तुझं डोकं ठिकाणावर असतं का? रोहितचा आणि त्याच्या भावाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफआन गाजत आहे.
रोहित शर्मा स्टॅन्डचं उदघाटना दरम्यान झाला भावूक
रोहित शर्मा म्हणाला, "आज जे होणार आहे त्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती. आज वानखेडेसारख्या ऐतिहासिक मैदानावर माझ्या नावाने स्टँड असेल. मी लहानपणी मुंबईसाठी, भारतासाठी खेळायचे स्वप्न पाहिले होते. मी इथे अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. आज माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी इथे उपस्थित आहेत, कोणीही याचा विचार केला नव्हता. मुंबई इंडियन्सचे सामने आणि सरावसत्रे हे याच मैदानावर होतात. त्यामुळे हा स्टँड माझ्यासाठी अधिक जवळचा आणि खास आहे. या खेळातील महान खेळाडूंमध्ये माझे नाव दिसतेय.. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.''