Rohit Sharma Sydney Match: अत्यंत चुकीचा निर्णय! सिडनी कसोटीतून रोहित शर्माला वगळल्यानं सिद्धू पाजी संतापले, म्हणाले...
गेल्या काही काळापासून रोहित शर्माचा फॉर्म फारच खराब राहिला आहे तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने मागील ४ कसोटी सामने गमावले आहेत. ज्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर असून सिडनी कसोटी मालिकेमध्ये बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला अखेरची संधी आहे. सध्या भारतीय संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळत नाही यासाठी क्रिकेटप्रेमींकडून कर्णधार रोहित शर्माला जबाबदार ठरवलं जात आहे. दरम्यान आता सिडनी कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी आता भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला कर्णधार पद देण्यात आलं आहे.
सिडनी कसोटीमधून कर्णधार रोहित शर्मा बाहेर
भारतीय संघाच्या यादीत एकूण 16 नावे होती ज्यामध्ये रोहित शर्मा केवळ प्लेइंग इलेव्हनमधूनच नाही तर संघाबाहेरही होत आहे असं दिसून येत आहे. या यादीमध्ये संघात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंची नावे आहेत मात्र यात रोहितचे नाव नव्हते. दरम्यान माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी सिडनी कसोटीतून रोहित शर्माला वगळल्यानं संताप व्यक्त केला आहे. एक महान खेळाडू ज्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमला अडीअडचणींमधून अनेकदा बाहेर काढलं आहे, एक कर्णधार म्हणून लहान खेळाडूंना वडिलधाऱ्यांसारख काय चांगल काय वाईट याबद्दल शिकवलं आहे, अशा इज्जदार माणसाबाबद अत्यंत चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे... -काय म्हणाले सिद्धू पाजी
आज भारतीय कर्णधार रोहित शर्माला टीममधून बाहेर बसवलं गेल आहे...हे आश्चर्यकारक आहे हे असं इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघात घडलेलं आहे. एक कर्णधार बाहेर बसला आहे... की कर्णधार बनवलाच नाही? एक महान खेळाडू ज्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमला अडीअडचणींमधून अनेकदा बाहेर काढलं आहे.... मग त्याचा फॉर्म चुकीचा आहे किंवा नाही आहे, हे महत्त्वाचं नाही आहे...
कर्णधार कोणता पर्याय नाही... की तो संघाच्या हितासाठी बाहेर जाईल, मला वाटतं की भले तुम्ही त्याला बाहेर काढलं असेल, त्याला कोणता पर्याय दिला असेल, मॅनेजमेंट कधीच एका कर्णधाराला पर्याय म्हणून नाही पाहू शकत की त्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं, आणि तो कर्णधार ज्याने संघ तयार केला, संघामधील प्रत्येक खेळाडूच्या मनात विश्वास जागवला असेल, ज्याने लहान खेळाडूंना वडिलधाऱ्यांसारख काय चांगल काय वाईट याबद्दल शिकवलं आहे, आणि हा खुप सन्मान मिळवलेला इज्जदार माणूस आहे... हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिली आहे.